VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 2 August 2021
विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी चर्चा करताना ही माहिती दिली. देशातील दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. कोरोना अद्याप संपलेला नाही. निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील.
ऑगस्टच्या शेवटपर्यंत तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल करण्याबाबत मंत्रिमंडळात एकमत झालेलं नाही. फक्त चर्चा झाली, असं सांगतानाच टास्क फोर्सशी चर्चा करूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्बंध शिथिल करण्याबाबत अंतिम निर्णय घेतील, असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी चर्चा करताना ही माहिती दिली. देशातील दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. कोरोना अद्याप संपलेला नाही. निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील. व्यापाऱ्यांच्या भावना योग्य आहेत. पण कोरोनाच्या बाबतीत ढिलाई महागात पडू शकतात.