VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 2 January 2022
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर खास आपल्या शैलीत जोरदार टोलेबाजी केली. शिवाय सिंधुदुर्ग जिल्हा बँक ज्यांच्या ताब्यात गेलीय, त्यांनी चांगलं काम करावं, असं म्हणत शरसंधान साधलं. सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीवरून सुरू असलेले धुमशान अजूनही आरोप-प्रत्यारोप आणि टीकेमुळे कायम आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर खास आपल्या शैलीत जोरदार टोलेबाजी केली. शिवाय सिंधुदुर्ग जिल्हा बँक ज्यांच्या ताब्यात गेलीय, त्यांनी चांगलं काम करावं, असं म्हणत शरसंधान साधलं. सिंधुदुर्ग बँकेच्या निवडणुकीवरून सुरू असलेले धुमशान अजूनही आरोप-प्रत्यारोप आणि टीकेमुळे कायम आहे. आता यावर राणेंची प्रतिक्रिया काय येते, हे पाहावे लागेल. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोकणात आम्ही काय मदत केली हे सगळ्यांना माहिती आहे. तौक्ते चक्रीवादळात मदत केली. बंधारे बांधतोय. राणेंनी इतरांची उणीदुणी काढण्यापेक्षा ते बी केंद्रात मंत्री आहेत. त्यांनीही निधी आणावा. कामे करावी. सिंधुदुर्ग जिल्हा बँक ज्यांच्या ताब्यात गेलीय. त्यांनी चांगलं काम करून दाखवाव.