VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 21 December 2021
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील मंदिर आणि मशिदीच्या जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला. तसेच या घोटाळ्यावरून भाजपवरही जोरदार हल्ला चढवला. सात देवस्थानाच्या बाबतीत राम खाडे यांनी तक्रार केली आहे. गृहखाते, महसूल खाते आणि ईडीकडेही या दहा प्रकारणाची तक्रार केली आहे.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील मंदिर आणि मशिदीच्या जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला. तसेच या घोटाळ्यावरून भाजपवरही जोरदार हल्ला चढवला. सात देवस्थानाच्या बाबतीत राम खाडे यांनी तक्रार केली आहे. गृहखाते, महसूल खाते आणि ईडीकडेही या दहा प्रकारणाची तक्रार केली आहे. त्यात मच्छिंद्रनाथ मल्टि इस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचाही सहभाग आहे. या सर्व जागा खालसा करत असताना या कोऑपरेटीव्हच्या माध्यमातून जे बगलबच्चे तयार करण्यात आले त्यांच्या खात्यात पैसे गेले. त्यातून खरेदी खत करण्यात आले. तिथल्या दोन नेत्यांचे नाव ईडीच्या तक्रारीत आहेत. त्यात भाजपचे आमदार सुरेश धस यांचं नाव आहे. त्याचबरोबर आष्टीचे माजी आमदार दोंदे यांच्या नावानेही तक्रार झाली आहे, असं मलिक यांनी सांगितलं.