VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 21 July 2021

| Updated on: Jul 21, 2021 | 12:57 PM

मुंबईत पावसानं जोरदार पुनरागमन केलं आहे. मुंबईत मिठी नदी दुथडी भरुन वाहत आहे. समुद्राला आज भरती असल्यानं प्रशासन अ‌ॅलर्ट झालं आहे. मुंबईतील 24 वार्ड मध्ये प्रशासन दक्ष झालं आहे.

मुंबईत पावसानं जोरदार पुनरागमन केलं आहे. मुंबईत मिठी नदी दुथडी भरुन वाहत आहे. समुद्राला आज भरती असल्यानं प्रशासन अ‌ॅलर्ट झालं आहे. मुंबईतील 24 वार्ड मध्ये प्रशासन दक्ष झालं आहे. समुद्रात 4 मीटर उंचीच्या लाटा उसळतील असा अंदाज आहे. किंग्ज सर्कल परिसरातही पाणी असल्याचं समोर आलं आहे. काल उसंत घेतलेल्या पावसानं आज पुन्हा कमबॅक केलं आहे. सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरीला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. नाशिक, परभणी, हिंगोली, नांदेड, गोंदिया आणि गडचिरोलीला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

VIDEO : Satara Crime | बोनेटवर बसून तलवारीने केक कापला, साताऱ्यातील गुंड पोलिसांच्या ताब्यात
Gopichand Padalkar | मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही, पडळकरांची खोचक टीका