VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 21 May 2022
पुण्यातील लाल महालात अखिल भारतीय मराठा महासंघाकडून शुद्धीकरण करण्यात आले आहे. ज्याठिकाणी गाण्याचे शूटिंग झाले, त्या संपूर्ण परिसराचे शुद्धीकरण अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे करण्यात आले आहे. माँ जिजाऊंच्या पुतळ्याला यावेळी दुग्धाभिषेक घालून अन् शूट झालेल्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले. लाल महाल याठिकाणी गाण्याचे शूटिंग करून त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते.
पुण्यातील लाल महालात अखिल भारतीय मराठा महासंघाकडून शुद्धीकरण करण्यात आले आहे. ज्याठिकाणी गाण्याचे शूटिंग झाले, त्या संपूर्ण परिसराचे शुद्धीकरण अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे करण्यात आले आहे. माँ जिजाऊंच्या पुतळ्याला यावेळी दुग्धाभिषेक घालून अन् शूट झालेल्या ठिकाणी गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले. लाल महाल याठिकाणी गाण्याचे शूटिंग करून त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले होते. लावणीच्या स्वरुपातील हे रील्स समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त करण्यात आला होता. विविध पुरोगामी संघटनांनी याचा निषेध नोंदवला होता. तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय मराठा महासंघ यासह राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही आक्रमक होत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
Published on: May 21, 2022 01:14 PM