VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 21 October 2021
गेले दोन दिवस दैनिक प्रहारमधून नाराय़ण राणे दसरा मेळाव्याला काय उत्तर देणार याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. सेना आणि राणे यांच्यातील राजकीय वादामुळे नारायण राणे यांनी हार आणि प्रहार या मथळ्याखाली थेट शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसऱ्या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्याच दैनिक प्रहारमधून उत्तर दिलंय. गेले दोन दिवस दैनिक प्रहारमधून नाराय़ण राणे दसरा मेळाव्याला काय उत्तर देणार याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. सेना आणि राणे यांच्यातील राजकीय वादामुळे नारायण राणे यांनी हार आणि प्रहार या मथळ्याखाली थेट शिवसेनेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलंय. हिंमत असेल तर अंगावर घ्या वेळ आणि तारीख सांगा असं थेट आव्हान राणेंनी दैनिक प्रहार मधून दिलंय. दैनिक प्रहारमधून नारायण राणें यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदासंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला आहे.