VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 22 July 2021

| Updated on: Jul 22, 2021 | 12:55 PM

रात्रभर झालेल्या पावसामुळे चिपळूण जलमय झाले आहे. पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण शहरातील जुना बाजार पूल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले असून दिसेनासे झाले आहेत.

रात्रभर झालेल्या पावसामुळे चिपळूण जलमय झाले आहे. पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण शहरातील जुना बाजार पूल आणि नवा पूल हे पूर्ण पाण्याखाली गेले असून दिसेनासे झाले आहेत. रात्रभर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने याशिवाय कुंभार्ली घाट माथ्यापासून मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने पाणी शहरात आले आहे. वाशिष्टी, शिवनदीला आलेल्या पुराच्या पाण्याची पातळी आणखी वाढत आहे. पाणी वाढण्याचा वेग मोठा आहे.

हायटाईड व अतिवृष्टी वेळ एकत्र आल्यामुळे खेड व चिपळूण मध्ये गंभीर परिस्थिती आहे असे जिल्हा प्रशासनकडून सांगण्यात आले आहे. बचावकार्यासाठी स्थानिक चिपळूण नगरपालिका 2 बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन चालु केले आहे. तर रत्नागिरी मधून 1, पोलीस विभागाकडील 1 व कोस्टगार्डची 1 बोट अश्या 3 बोटी रेस्क्यू ऑपरेशनसाठी पाठविणेत आल्या आहेत.

 

VIDEO : Ratnagiri Rain | चिपळूणमधील स्वर संकुल विहार बाजारपेठ पूर्ण पाण्याखाली
VIDEO : Chiplun Update | चिपळूणच्या हाहा:काराची 10 दृश्य, खासदार विनायक राऊत दिल्लीवरुन कोकणाकडे रवाना