VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 22 June 2021
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक शनिवारी (19 जून) माध्यमांसमोर आले. सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून त्यात आपलं मत मांडलं आहे.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक शनिवारी (19 जून) माध्यमांसमोर आले. सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून त्यात आपलं मत मांडलं आहे. यामध्ये त्यांनी भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिलाय. यावर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले की, प्रताप सरनाईकंच नाही, तर शिवसेनेचे 90 टक्के आमदार, खासदार सरकारवर नाराज आहेत. सरकारमध्ये फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचीच कामं होत आहेत. काँग्रेस – राष्ट्रवादी आपला पक्ष मजबूत करतायत, शिवसेना कमजोर होत आहे. यामुळे शिवसेनेचे खासदार आणि आमदार या सरकारवर नाराज आहेत.