VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 25 January 2022
कोरोनानंतर प्रदीर्घ कालाखंडानंतर कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरभाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची आता गर्दी वाढत असल्याने वादावादीच्या घटना घडत आहेत. अंबाबाईच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासर अनेक राज्यांतूनही भाविक येत असतात.
कोरोनानंतर प्रदीर्घ कालाखंडानंतर कोल्हापूरातील अंबाबाई मंदिरभाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची आता गर्दी वाढत असल्याने वादावादीच्या घटना घडत आहेत. अंबाबाईच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासर अनेक राज्यांतूनही भाविक येत असतात. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला अंबाबाईचे तात्काळ दर्शन पाहिजे असते त्यासाठी रांगेत उभा राहण्यापासून ते अगदी ई-पास काढण्यासाठी वाटेल ते प्रयत्न भाविकांकडून केले जातात. आजही अंबाबाईच्या दर्शनासाठी महिला आणि पुरुष रांगेत थांबले असता ई-पास काढण्यावरून त्यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यानंतर सुरक्षिततेासाठी तैनात असणाऱ्या पोलिसांनी मध्यस्ती करून हा वाद मिठविण्यात आला.