VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 28 July 2022
अजित पवार सध्या गडचिरोली दाैऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी ओल्या दुष्काळाची पाहणी देखील केलीयं. सध्याच्या स्थितीला शेतकरी हा शून्य टक्क्याने घेतलेले कर्जाचीही परतफेड करु शकत नाही. आता जर पुर्नगठनाचा विचार केला तर नव्याने घेतले जाणारे कर्ज आणि पूर्वीचे कर्ज असा भार शेतकऱ्यांवर पडणार आहे.
अजित पवार सध्या गडचिरोली दाैऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी ओल्या दुष्काळाची पाहणी देखील केलीयं. सध्याच्या स्थितीला शेतकरी हा शून्य टक्क्याने घेतलेले कर्जाचीही परतफेड करु शकत नाही. आता जर पुर्नगठनाचा विचार केला तर नव्याने घेतले जाणारे कर्ज आणि पूर्वीचे कर्ज असा भार शेतकऱ्यांवर पडणार आहे. त्यामुळे पुर्नगठन हा त्यावरील मार्ग नाहीतर आगोदर नियमित कर्जाची परतफेड कऱणाऱ्यांना 50 हजाराचे अनुदान हे महत्वाचे आहे. आणि कर्जाच्या बाबतीत राज्यातील इतर शेतकऱ्यांची म्हणणे काय आहे ते पाहून शासन दरबारी मागण्या केल्या जातील असेही अजित पवार यांनी सांगितले आहे. तसेच जेवढ्या शक्य आहे तेवढ्या लवकर शेतकऱ्यांना मदत देण्याचीही मागणी पवारांनी केलीयं. तसेच मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून निर्णय न घेतला, प्रत्यक्ष पाहणी देखील करण्याची विनंती पवारांनी केलीयं.