VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 28 October 2021
एनसीबीची दिल्लीतील एक टीम समीर वानखेडेंची चौकशी करण्यासाठी आली आहे. चौकशीसाठी आलेली टीम खऱ्या गोष्टींची चौकशी करेल अशी आशा आहे. ही टीम चुकांवर पांघरून घालणार नाही अशी आशा आहे, असा चिमटा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढला.
एनसीबीची दिल्लीतील एक टीम समीर वानखेडेंची चौकशी करण्यासाठी आली आहे. चौकशीसाठी आलेली टीम खऱ्या गोष्टींची चौकशी करेल अशी आशा आहे. ही टीम चुकांवर पांघरून घालणार नाही अशी आशा आहे, असा चिमटा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काढला. जयंत पाटील आज दापोलीत आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला. एनसीबीची टीम वानखेडेच्या चौकशीसाठी आलीय. वानखेडेची चौकशी करतेय. वानखेडे याने घेतलेला दाखला व IRS मध्ये जो प्रवेश घेतला तो कोणत्या जातीच्या आधारावर घेतला याचं गणित लवकरच उकळेल आणि फसवणूक कुणी केली व कशी केली याचा खुलासादेखील लवकरच होईल.