VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 29 May 2022
कोणत्याही विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी सोशल मीडिया हे एक प्रभावी व सशक्त व्यासपीठ आहे. मात्र, हल्ली या माध्यमाचा गैरवापर करून समाज तोडण्याचे कृत्य भाजपाद्वारे सुरू आहे. आम्ही मात्र या सोशल मीडियाच्या माध्यमातून वास्तव मांडून एकसंघ समाजनिर्मितीचे ध्येय पूर्ण करू, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या वतीने वनामती सभागृहात आयोजित राज्यस्तरीय नवसंकल्प शिबिरात ते बोलत होते.
कोणत्याही विचारांच्या प्रचार-प्रसारासाठी सोशल मीडिया हे एक प्रभावी व सशक्त व्यासपीठ आहे. मात्र, हल्ली या माध्यमाचा गैरवापर करून समाज तोडण्याचे कृत्य भाजपाद्वारे सुरू आहे. आम्ही मात्र या सोशल मीडियाच्या माध्यमातून वास्तव मांडून एकसंघ समाजनिर्मितीचे ध्येय पूर्ण करू, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या वतीने वनामती सभागृहात आयोजित राज्यस्तरीय नवसंकल्प शिबिरात ते बोलत होते. या वेळी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया प्रमुख रोहन गुप्ता, काँग्रेस प्रवक्त्या अलका लांबा, सोशल मीडिया तज्ज्ञ अमेय तिरोडकर, सोशल मीडिया प्रमुख विशाल मुत्तेमवार, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.
Published on: May 29, 2022 01:18 PM