VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 29 September 2021
संजय राऊत यांनी आधी ‘सामना’च्या अग्रलेखातून गोव्याच्या राजकीय परिस्थितीवरून भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मीडियाशी संवाद साधताना भाजपला लक्ष्य केलं आहे. लहान राज्यात सरकार आणून किंवा लोकप्रतिनिधी फोडून सत्तेचा खो खोचा खेळ सुरू आहे. गोव्याच्या जनतेची फसवणूक सुरू आहे.
संजय राऊत यांनी आधी ‘सामना’च्या अग्रलेखातून गोव्याच्या राजकीय परिस्थितीवरून भाजपवर निशाणा साधला होता. त्यानंतर पुन्हा एकदा मीडियाशी संवाद साधताना भाजपला लक्ष्य केलं आहे. लहान राज्यात सरकार आणून किंवा लोकप्रतिनिधी फोडून सत्तेचा खो खोचा खेळ सुरू आहे. गोव्याच्या जनतेची फसवणूक सुरू आहे. जे निवडून आले आहेत ते पक्ष बदल करत आहेत आणि ज्या पक्षात जात आहेत त्यांना लाज नाही असं म्हणत राऊत यांनी काँग्रेस आणि भाजपवर शरसंधान साधलं. गोव्यात पक्ष फोडले जातात आणि सत्ता हस्तगत केली जाते. महाराट्रात आम्ही पक्ष फोडले नाहीत तर आम्ही तीन पक्ष एकत्र आलो, अस राऊत म्हणाले. गोव्यात आप, तृणमूल सारखे पक्ष निवडणूक लढवणार आहेत. शिवसेनेची गोव्यात ताकत आहे. आम्ही 22 जागा लढवणार आहोत.