VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 8 September 2021

| Updated on: Sep 08, 2021 | 1:30 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची माहिती देऊन या सोहळ्याला मुख्यमंत्री असावेच असं काही नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बाप असावा तर असा असं विधान केलं होतं. त्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पलटवार केला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची माहिती देऊन या सोहळ्याला मुख्यमंत्री असावेच असं काही नाही, असं म्हटलं होतं. त्यानंतर भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बाप असावा तर असा असं विधान केलं होतं. त्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पलटवार केला आहे. बाप हा बापच असतो. पण तो आयत्या बिळावरचा नागोबा नसावा, असं विनायक राऊत म्हणाले आहेत. विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राणे पितापुत्रांवर हल्ला चढवला. आम्ही चिपी विनातळासाठी काय प्रयत्न केले आणि संबंधित विभागाने आमच्याशी काय पत्रव्यवहार केला हे काही अज्ञान माणसाला कळत नाही, असंही विनायक राऊत म्हणाले आहेत.

औरंगाबादेत शिवना नदीच्या पाणीपातळीत वाढ; लासूर-गंगापूर शहरांचा संपर्क तुटला
VIDEO : Beed | बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला पूर, 6 गायी गेल्या वाहून