VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 16 July 2021
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा नाशिक दौरा महत्वाचा मानला जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून तीन दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा नाशिक दौरा महत्वाचा मानला जात आहे. राज ठाकरे हे 16, 17, 18 जुलै रोजी नाशिक दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात राज ठाकरे नाशिक महापालिका निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करु नका, असं आवाहन राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं आहे. नाशिक महापालिकेत यापूर्वी मनसेची सत्ता होती. येत्या काळात नाशिक महापालिकेची निवडणूक होणार आहे त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा नाशिक दौरा महत्वाचा मानला जात आहे.