VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 31 March 2022

| Updated on: Mar 31, 2022 | 3:53 PM

भाजपच्या नेत्यांना नोटीस पाठवली की, राज्य सरकारकडून अत्याचार होतोय म्हणून कांगावा केला जातो. मात्र, आम्ही काही कुठे बोलले की थेट कारवाई होते. आता या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष घालावे. हा अतिरेक थांबवावा, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ  यांनी केले. ते नाशिकमध्ये बोलत होते. काँग्रेस आणि नाना पटोले यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरी आज ईडीने धाड टाकली.

भाजपच्या नेत्यांना नोटीस पाठवली की, राज्य सरकारकडून अत्याचार होतोय म्हणून कांगावा केला जातो. मात्र, आम्ही काही कुठे बोलले की थेट कारवाई होते. आता या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी लक्ष घालावे. हा अतिरेक थांबवावा, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ  यांनी केले. ते नाशिकमध्ये बोलत होते. काँग्रेस आणि नाना पटोले यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरी आज ईडीने धाड टाकली. उके यांचे सकाळपासून चौकशी सुरू होती. त्यानंतर आता ईडीने सतीश उके यांना ताब्यात घेतले आहे. सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार ही सर्व कारवाई होत आहे, असा आरोप उके यांच्या कुटुंबीयांनी केलाय. विशेष म्हणजे लोहिया प्रकरण तसेच निमगडे हत्याकांडप्रकरणी उके हे वकील आहेत.

VIDEO : वकीलांवर होत असलेल्या कारवाईचा Nagpur वकील संघटनांकडून निषेध
Aurangabad : बबनराव लोणीकरांच्या अडचणी वाढणार, अट्रॉसिटीची तक्रार दाखल