MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100

| Updated on: Jul 26, 2021 | 8:13 PM

राज्यात पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला मंत्री आदित्य ठाकरे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी उपस्थित होते.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100

1) राज्यात पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला मंत्री आदित्य ठाकरे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी उपस्थित होते.

2) पूरग्रस्तांसाठी दोन दिवसांत आर्थिक घोषणा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली .

3) राज्यात अतिवृष्टीमुळे 290 रस्ते बंद आहेत. 469 रस्त्यावरची वाहतूक खंडित आहे. या सर्व रस्त्यांची पाहणी करण्याचे निर्देश मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.

4) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी साताऱ्यातील पाटण तालुक्यात निघाले होते. मात्र, कोयनानगर भागात पाऊस असल्यामुळे मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टर पुन्हा परत पुण्यात पोहोचले.

5) सांगलीतील भिलवणी भाग अद्यापही पाण्याखाली आहे. या भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली.