MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 December 2021
ओमिक्रॉन व्हायरसचे दोन रुग्ण कर्नाटक राज्यात सापडताच कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला जाग आलीय. काल आरोग्य विभागाने कर्नाटकातील दोन रुग्णांसंदर्भात माहिती देताच कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील तपासणी नाके सुरु करण्यात आलेत. कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची या नाक्यावर तपासणी केली जाते.
ओमिक्रॉन व्हायरसचे दोन रुग्ण कर्नाटक राज्यात सापडताच कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला जाग आलीय. काल आरोग्य विभागाने कर्नाटकातील दोन रुग्णांसंदर्भात माहिती देताच कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील तपासणी नाके सुरु करण्यात आलेत. कर्नाटकातून महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची या नाक्यावर तपासणी केली जाते. इतकंच नाही तर या प्रवाशांच थर्मल चेकिंग सुद्धा होतंय. जिल्ह्यात प्रवेश करणार्या राज्य सीमांवर तपासणी नाके सुरु करण्याच्या सूचना दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले होते. मात्र, प्रशासकीय यंत्रणेकडून याकडे साफ दुर्लक्ष केलं गेलं होतं, मात्र कर्नाटकात नव्या व्हेरियंट सापडल्यावर का होईना जिल्हा प्रशासनाला जाग आली.