MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 10 October 2021

| Updated on: Oct 10, 2021 | 8:07 AM

कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. ती शांत आहे, संयमी आहे. म्हणून सदासर्वदा भयभीत होऊन ती काही करेल असं अजिबात नाही, ती मर्द आहे. म्हणूनच त्या जनतेनं तिच्या हक्काचा लोकप्रतिनिधी अनेक वर्षांपासून निवडून दिला आहे.

चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले आहेत. तब्बल 16 वर्षांनी हे दोन्ही नेते एकत्र पाहयाला मिळाली. मात्र यावेळी नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वैर पुन्हा एकदा पाहायला मिळालं. इतकंच नाही तर व्यासपीठावरुन बोलताना नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. राणे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला. तर उद्धव ठाकरे यांनी राणेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

नारायण राणे यांच्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. नारायणराव आपण म्हता ते खरं आहे. तुम्ही जी विकासकामं केली त्यात तुमचं योगदान नक्की आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद नक्की देतो. पण कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. ती शांत आहे, संयमी आहे. म्हणून सदासर्वदा भयभीत होऊन ती काही करेल असं अजिबात नाही, ती मर्द आहे. म्हणूनच त्या जनतेनं तिच्या हक्काचा लोकप्रतिनिधी अनेक वर्षांपासून निवडून दिला आहे. म्हणून खासदार विनायक राऊत यांचा मला अभिमान आहे. हे ही खरं आहे की, बाळासाहेबांना खोटं बोलणारी लोकं आवडत नव्हती. म्हणूनच अशी खोटं बोलणारी लोकं त्यांनी शिवसेनेतून काढून टाकली होती, हा सुद्धा इतिहास आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंवर पलटवार केलाय.

Published on: Oct 10, 2021 08:07 AM
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 10 October 2021
Ajit Pawar | अजित पवार बारामती दौऱ्यावर, पवारांकडून कऱ्हा नदीच्या कामाची पाहणी