MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 12 July 2021

| Updated on: Jul 12, 2021 | 8:40 AM

वेंगुर्ल्यातील लोकार्पणाच्या कार्यक्रमात केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या नारायण राणेंनी विकासासाठी एकत्र येण्याचा सल्ला दिलाय. नांदा सौख्य भरे असे सांगत एक वेगळा राजकीय संदेश त्यांनी कोकणातून दिलाय.

कोकण आणि या कोकणातील राजकीय राडे आपण अनेक वेळा पाहिले असतील, पण जरा थांब आणि हे पहा. नितेश राणे आणि विनायक राऊत यांच्यातील हितगुज पाहा. टीका करण्याची कोणतीही संधी न सोडणाऱ्या शिवसेना आणि राणेंमध्ये मनोमिलन पाहायला मिळालंय. निमित्त होतं वेंगुर्ल्यातील सागररत्न मत्य बाजारपेठेच्या लोकार्पणाचं. त्यामुळे नितेश राणेंनी शिवसेनेशी जुळवून घेण्याची तयारी दर्शवलीय का? मंत्रिपद मिळाल्यानंतर राणे कुटुंबियांमध्ये नरमाई आलीय का? कोकणात शिवसेना-भाजप नेत्यांचे ‘मनोमिलन’ झालेय का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. यावरीलच हा खास रिपोर्ट

वेंगुर्ल्यातील लोकार्पणाच्या कार्यक्रमात केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या नारायण राणेंनी विकासासाठी एकत्र येण्याचा सल्ला दिलाय. नांदा सौख्य भरे असे सांगत एक वेगळा राजकीय संदेश त्यांनी कोकणातून दिलाय. शिवसेना आणि राणे यांच्यातील राजकीय वैर आपण नेहमी पाहिलं. मात्र यावेळी चित्र उलट होतं. आज पाहिलेल्या या दृश्यांमुळे यूतीची चर्चा पुन्हा रंगलीय. वरिष्ठांनी आदेश दिला तर आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून काम करु, असं म्हणत नितेश राणेंनी जणू राजकीय संकेतच दिलेत.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 12 July 2021
Fuel Price Hike | पुन्हा इंधन दरवाढ, मुंबईत पेट्रोल शंभरी पार