MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 12 September 2021

| Updated on: Sep 12, 2021 | 8:04 AM

साकीनाका बालात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. विरोध पक्षातील नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवायला सुरुवात केलीय.

साकीनाका बालात्कार प्रकरणातील पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. विरोध पक्षातील नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवायला सुरुवात केलीय. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल असं जाहीर केलं आहे. दरम्यान, या धक्कादायक घटनेनंतर आज उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलिसांची महत्वाची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी पोलिसांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. त्यात मुंबईची सुरक्षित शहर ही प्रतिमा डागाळू नये यासाठी सतर्क राहण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

साकीनाका येथील घटनेबाबत  पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या दहा मिनिटांत  त्याठिकाणी पोहचून जखमी महिलेस राजावाडी रुग्णालयात दाखल केले आणि कुठेही वेळ दवडला नाही तसेच तातडीने संशयितास पकडले याविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. या बैठकीस राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि मिलिंद भारंबे उपस्थित होते.  मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी तसेच पोलिस करीत असलेल्या तपासाविषयी जाणून घेतले व एकूणच चौकशीवर समाधान व्यक्त केले.

Published on: Sep 12, 2021 08:04 AM
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 12 September 2021
Breaking | केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नातेवाईक आणि वॉर्डबॉय यांच्यात वाद