MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 16 September 2021

| Updated on: Sep 16, 2021 | 8:24 AM

आयकर विभागाने बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून सोनू सूद याच्या निवासस्थान, कार्यालय आणि हॉटेलवर छापे टाकायला सुरुवात केली होती. त्यापैकी घरातील झाडाझडतीची मोहीम तब्बल 20 तास सुरु होती. यावेळी घरात सोनू सूद, त्याचे कुटुंबीय आणि संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

बॉलीवूड अभिनेत सोनू सूद याच्या घर आणि कार्यालयावर बुधवारी आयकर विभागाने छापे टाकले होते. त्यानंतर तब्बल 20 तास सोनू सूदच्या घरी झाडाझडती सुरु होती. अखेर गुरुवारी पहाटेच्या सुमारास आयकर विभागाचे अधिकारी एक-एक करुन घरातून बाहेर पडले. त्यामुळे आता पुढे काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

आयकर विभागाने बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून सोनू सूद याच्या निवासस्थान, कार्यालय आणि हॉटेलवर छापे टाकायला सुरुवात केली होती. त्यापैकी घरातील झाडाझडतीची मोहीम तब्बल 20 तास सुरु होती. यावेळी घरात सोनू सूद, त्याचे कुटुंबीय आणि संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता. आयकर विभागाचे अधिकारी गुरुवारी पहाटे सोनू सूदच्या घरातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्या हातात काही फाईल्स होत्या. या सगळ्यातून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेमके काय साध्य केले, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

World Corona Update | जगभरात धोका वाढला, चीनसह अमेरिकेतही कोरोना रुग्णसंख्येत वाढ
Nashik | नाशिकमध्ये डेंग्यू, चिकन गुनियाचा कहर, 10 दिवसात 140 जणांना डेंग्यूची बाधा