MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 18 October 2021
दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार आसूड ओढले. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनी गरळ ओकल्याची जळजळीत टीका केली. तर चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर जोरदार टीकास्त्र डागलं. आता भडकलेल्या राऊतांनी आज सामनामध्ये ‘कमी प्रतीचा गांजा’ या मथळ्याखाली अग्रलेख लिहून भाजप नेत्यांवर थेट हल्ला केला आहे.
दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार आसूड ओढले. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंनी गरळ ओकल्याची जळजळीत टीका केली. तर चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर जोरदार टीकास्त्र डागलं. आता भडकलेल्या राऊतांनी आज सामनामध्ये ‘कमी प्रतीचा गांजा’ या मथळ्याखाली अग्रलेख लिहून भाजप नेत्यांवर थेट हल्ला केला आहे. विरोधी पक्षाचे नेते कोणत्या नशेत बोलतात, याचा तपास एनसीबीने करावा, असं उपरोधिकपणे राऊत म्हणाले.
दसरा मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुखांचे भाषण परंपरेप्रमाणे गाजले आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री अशा दोन वेगळ्या भूमिकेत आहेत, पण दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो व शिवसेना पक्षप्रमुख मेळाव्यात आपले विचार मांडत असतात. भारतीय जनता पक्षाने ठाकरे यांच्या जोरदार भाषणावर बेंबीच्या देठापासून बोंबा मारायला सुरुवात केली आहे. फडणवीस यांनी तर ”उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे?” अशी ‘अलोकशाही’ भूमिका घेऊन मनातली भडास बाहेर काढली. उद्धव ठाकरे यांनी एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करु असे सांगितले होते, पण ते स्वतःच झाले, असा आक्षेप घेणारे फडणवीस किंवा चंद्रकांत पाटील कोण?
भाजपने महाराष्ट्राची सत्ता गमावून दोन वर्षे झाली. त्या धक्क्यातून त्यांनी सावरायला हवे. जे घडले आहे ते स्वीकारुन पुढे जायला हवे. राजकारणात हे असे चढ-उतार येतच असतात. सत्य स्वीकारले नाही तर निराशेचे आणि वैफल्याचे झटके येतात व लोक अमली पदार्थांच्या आहारी जातात. भाजपचे लोक दसरा मेळाव्यानंतर ज्या बेधुंद पद्धतीने शिमगा करीत आहेत, बेताल आरोप करीत आहेत ते बरे नाही. हे लोक नशेत वगैरे बोलत आहेत काय त्याचा तपास व्हावा.