MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 23 July 2021

| Updated on: Jul 23, 2021 | 8:29 AM

चिपळूण शहरात 202 मिमी पडलेला पाऊस, धरणातून सोडण्यात आलेले पाणी, भरतीची स्थिती अशा कारणांमुळे चिपळूणमध्ये 2005 पेक्षा भयानक स्थिती निर्माण झाली. चिपळूण परिसरात सध्या कुठेही विद्युत पुरवठा सुरु नसून पूरग्रस्तांची संपूर्ण रात्र अंधारात गेली. त्यातच मोबाईललाही नेटवर्क नसल्यामुळे संपर्क साधण्यास अनेक अडचणी येत आहेत.

चिपळूण शहरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पुराच्या पाण्याची पातळी ही जवळपास चार ते पाच फुटांनी खाली आली आहे. रात्रभर पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी पातळी वेगाने कमी होत आहे. त्यामुळे चिपळूणवासियांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला आहे. चिपळूणमध्ये सकाळच्या वेळात रिमझिम पाऊस सुरु आहे.

चिपळूण शहरात 202 मिमी पडलेला पाऊस, धरणातून सोडण्यात आलेले पाणी, भरतीची स्थिती अशा कारणांमुळे चिपळूणमध्ये 2005 पेक्षा भयानक स्थिती निर्माण झाली. चिपळूण परिसरात सध्या कुठेही विद्युत पुरवठा सुरु नसून पूरग्रस्तांची संपूर्ण रात्र अंधारात गेली. त्यातच मोबाईललाही नेटवर्क नसल्यामुळे संपर्क साधण्यास अनेक अडचणी येत आहेत.

चिपळूण शहरातील पूरस्थिती ओसरत असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून मदत कार्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. रात्री पाण्याचा वेग खूप असल्याने मदत कार्य करता आले नाही, तर काल दिवसभर चिपळूण शहरात पूरस्थिती होती. पुराच्या पाण्याचा वेग अधिक असल्याने फायबर बोटी त्यात टिकत नाहीत. त्यामुळे पूरग्रस्तांना बाहेर काढण्याच्या कामाला गती आलेली नाही. हेलिकॉप्टरने पूरग्रस्तांना मदत करण्याची घोषणा पालकमंत्री अनिल परब यांनी केली असली तरी काल दिवसभरात एकही हेलिकॉप्टर मदतीसाठी आले नव्हते.

Published on: Jul 23, 2021 08:29 AM
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 23 July 2021
Raigad Rain | महाड शहराला पुराचा वेढा, नागरिकांच्या मदतीसाठी NDRFची टीम दाखल