MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 25 August 2021

| Updated on: Aug 25, 2021 | 7:52 AM

आज सामनाच्या अग्रलेखातून राऊत यांनी नारायण राणेंना नको नको त्या उपमा देत त्यांच्यावर हल्ला चढवलाय. आजच्या अग्रलेखात त्यांनी राणेंना 5 उपमा दिल्यात. भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, उपटसुंभ, सरडा अशा उपमा देत त्यांनी राणेंवर प्रहार केलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द काढल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आपल्या वक्तव्याची किंमत चुकवावी लागली. काल त्यांना अटक करण्यात आली आणि रात्री उशिरा जामीनही मंजूर करण्यात आला. एव्हाना थोडं काही झालं तरी शिवसेना नेते संजय राऊत मीडियाशी लगेच बोलतात, पण काल सगळ्या घडामोडी घडत असताना त्यांनी मीडियाला एन्टरटेंट करणं टाळलं. मात्र आज सामनाच्या अग्रलेखातून राऊत यांनी नारायण राणेंना नको नको त्या उपमा देत त्यांच्यावर हल्ला चढवलाय. आजच्या अग्रलेखात त्यांनी राणेंना 5 उपमा दिल्यात. भोकं पडलेला फुगा, बेडूक, छपरी गँगस्टर, उपटसुंभ, सरडा अशा उपमा देत त्यांनी राणेंवर प्रहार केलाय.

नारायण राणे हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. ही सर्व शिवसेना या चार अक्षरांची कमाई. राणे यांनी शिवसेना सोडल्यावर त्यांचा लोकसभा व विधानसभा मिळून चार वेळा दणकून पराभव शिवसेनेने केला. त्यामुळे राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचेच तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल. हा फुगा कितीही हवा भरुन फुगवला तरी वर जाणार नाही, पण भाजपने सध्या हा भोकवाला फुगा फुगवून दाखविण्याचे ठरवले आहे.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 25 August 2021
Ratnagiri | राजापुरात भाजप-शिवसेना कार्यकर्ते भिडले, नगरसेवक विनय गुरव यांनाही धक्काबुक्की