MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 26 October 2021
‘माझं नाव दाऊद पहिल्यापासूनही कधी नव्हतं. आताही नाही. जन्मल्यापासून माझं नाव ज्ञानदेव कचरूजी वानखेडे आहे. शाळेत जाण्यापासून, कॉलेजला जाण्यापासून, एलएलबीला प्रवेश घेण्यापासून, डिपार्टमेंटला जाण्यापासून, रिटायर होण्यापासून माझं नाव ज्ञानदेव वानखेडे आहे. हे कुणीतरी गैरवापर करुन किंवा बनावट केलं असेल, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही किंवा माहितीही नाही’, असं उत्तर समीर वानखेडे यांच्या वडिलांनी दिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो आणि काही कागदपत्रंही ट्वीट केले आहेत. त्यावर यहाँ से शुरू होता है फर्जिवाडा, असंही मलिक यांनी म्हटलंय. ट्विटरच्या माध्यमातून नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे याने फर्जीवाडा करुन नोकरी कशी मिळवली आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केलाय. मलिकांच्या या आरोपांना समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या वडिलांनीही उत्तर दिलंय.