MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 27 October 2021
नवाब मलिक यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना केपी गोसावी संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. काल मी एक गोष्ट सांगितली होती. मला भीती वाटते की उद्या के. पी गोसावीचा मनसुख हिरेन होऊ नये. जो आरोपी लपलेला होता, नंतर तो टीव्हीला फोन देऊ लागला. त्यामुळे त्याला कुठे तरी लपून ठेवलं होतं असं मला वाटतं. मनसुख हिरेनवाला आरोप लागल्याने तो बाहेर आला. तो बाहेर आल्याने पुणे पोलीस त्याच्या फोनला ट्रॅक करत असून त्याला अटक करेल, असं मला वाटतं, असं मलिक म्हणाले.
क्रुझ ड्रग्ज पार्टीवरील पंच केपी गोसावी याचा अजूनही शोध लागलेला नाही. पुणे पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मोठं विधान केलं आहे. केपी गोसावी यांचा मनसुख हिरेन होऊ नये, अशी भीतीच नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.
नवाब मलिक यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना केपी गोसावी संदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं. काल मी एक गोष्ट सांगितली होती. मला भीती वाटते की उद्या के. पी गोसावीचा मनसुख हिरेन होऊ नये. जो आरोपी लपलेला होता, नंतर तो टीव्हीला फोन देऊ लागला. त्यामुळे त्याला कुठे तरी लपून ठेवलं होतं असं मला वाटतं. मनसुख हिरेनवाला आरोप लागल्याने तो बाहेर आला. तो बाहेर आल्याने पुणे पोलीस त्याच्या फोनला ट्रॅक करत असून त्याला अटक करेल, असं मला वाटतं, असं मलिक म्हणाले.
समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे माझी कन्या निलोफर मलिक हिचे कॉल डिटेल्स मागितले होते. अशी माहिती देतानाच अशी खाजगी माहिती काढण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यांनी मर्यादित अधिकाराने राहिले पाहिजे, असे मलिक यांनी स्पष्ट बजावले. वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे सीडीआरची मागणी केली होती. परंतु मुंबई पोलिसांनी एखाद्याच्या खासगी जीवनाची माहिती देऊ शकत नाही असे सांगितले. मात्र वानखेडे याने मुंबई आणि ठाण्यातील दोन खाजगी व्यक्ती फोन टॅपिगसाठी ठेवले असून त्या दोन व्यक्तींची नावे आणि पत्ता माझ्याजवळ आहे. आता ही लढाई खूप लांबवर चालणार असून या गोष्टी येत्या काळात समोर आणणार असल्याचे त्यांनी सांगितलं.