MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 29 October 2021
आज आर्यन खानला जामीन मिळाल्यावर नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. इतकंच नाही तर मलिक यांनी वानखेडेंचा एक सूचक इशाराही दिला आहे.
‘काही दिवसापूर्वी मुंबई पोलिसांचे संरक्षण मागणारा समीर दाऊद वानखेडे आज अचानक मुंबई पोलिसांविषयी अविश्वास दाखवत आहे. याचा अर्थ याने फर्जीवाडा केलाय म्हणून मुंबई पोलिसांना घाबरत आहे’, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. आज आर्यन खानला जामीन मिळाल्यावर नवाब मलिक यांनी समीर दाऊद वानखेडेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. इतकंच नाही तर मलिक यांनी वानखेडेंचा एक सूचक इशाराही दिला आहे.
‘क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात आर्यन खान व इतर दोघांना हायकोर्टाने जामीन दिला आहे. कालच दोघांना एनडीपीएस कोर्टाने जामीन दिला होता. एकंदरीत आज ज्यापध्दतीने एनसीबीने युक्तीवाद केला. त्याअगोदरच ही केस किल्ला कोर्टात जामीन देण्यासारखी होती परंतु एनसीबीचे वकील नवनवीन युक्तीवाद करुन लोकांना जास्त दिवस तुरुंगात कसे ठेवता येईल असा प्रयत्न करत होते. शेवटी हायकोर्टाने जामीन दिला आहे’, असेही नवाब मलिक म्हणाले.