MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 6 October 2021

| Updated on: Oct 06, 2021 | 7:49 AM

या निवडणुकीत राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार असून, अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली आहे. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोट निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. सकाळी साडे 9 वाजल्यापासून निकाल जाहीर होण्यास सुरुवात होईल. मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षांचं भवितव्य ठरणार असून, अनेक राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी जोरदार कंबर कसली आहे. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

ZP Elections | राज्यातील 6 जिल्हा परिषदांसाठी सरासरी 63 टक्के मतदान
ZP Elections | राज्यातील 6 जिल्हा परिषदांसाठी सरासरी 63 टक्के मतदान, निकालाकडे राज्याचं लक्ष