MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 6 September 2021
त्यांनी राज ठाकरेंसह भाजपलाही फटकारलं. मला थोडसं आश्चर्य वाटतं. आपण सर्व गोष्टींची काळजी घेत असताना काही लोकांना अनेक गोष्टींची घाई झाली आहे. हे उघडा, ते उघडा, अमूक उघडा, तमूक उघडा, हे असं आहे, ते तसं आहे, असं काही लोक म्हणत आहेत. पण, मी सर्वांना सांगतो, थोडा धीर धरा. संयम धरा.
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्याच्या मुद्दयावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेला फटकारले आहे. अनेकांना अनेक गोष्टी उघडण्याची घाई झाली आहे. जरा धीर धरा. राजकारण आपल्या सर्वांचं होतं, पण जीव जनतेचा जातो, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे आणि भाजपला फटकारले आहे. (cm uddhav thackeray slams bjp and mns over lockdown restrictions)
कोविडच्य संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृतीदलाने आयोजित केलेल्या “माझा डॉक्टर” या ऑनलाईन परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी राज ठाकरेंसह भाजपलाही फटकारलं. मला थोडसं आश्चर्य वाटतं. आपण सर्व गोष्टींची काळजी घेत असताना काही लोकांना अनेक गोष्टींची घाई झाली आहे. हे उघडा, ते उघडा, अमूक उघडा, तमूक उघडा, हे असं आहे, ते तसं आहे, असं काही लोक म्हणत आहेत. पण, मी सर्वांना सांगतो, थोडा धीर धरा. संयम धरा. आपण ज्या गोष्टी उघडत आहोत त्या पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ नये याची खात्री पटवून आपण पुढे जात आहोत. मग अशावेळी घाई गर्दी केली तर आपण आणखी काही वर्षे, काही महिने या संकटातून बाहेरच पडू शकणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.