MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 7 August 2021

| Updated on: Aug 07, 2021 | 8:35 AM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा उद्यापासून चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांचं दिल्लीत काय सुरु आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

राज्याच्या राजकारणात भेटीगाठींचा सिलसिला सुरुच आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटी घेत असताना आता आणखी एका गुप्त भेटीची माहिती समोर आली आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत गुप्त भेटल्याचं सांगण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आज तातडीने दिल्ली रवाना होण्याची शक्यता आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सुद्धा उद्यापासून चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यामुळे भाजपच्या नेत्यांचं दिल्लीत काय सुरु आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

नुकतंच तीन दिवसापूर्वी शरद पवारांनी अमित शाहांची भेट घेतली होती. आज चंद्रकांत पाटील-राज ठाकरे यांची भेट झाली. हे सर्व माध्यमांसमोर येत असताना आता आशिष शेलार-अमित शाहांची गुप्त बैठक झाल्याचं सांगण्यात येत आहे. इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस हे आता अमित शाहांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Published on: Aug 07, 2021 08:35 AM
Mumbai Breaking | मुंबईत 4 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांचा तपास सुरू
SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 7 August 2021