MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 8 August 2021
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी आधी सामना दैनिकात हटके शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी ट्विटरवरुनही तेजस ठाकरे यांना भन्नाट शुभेच्छा दिल्या आहेत. “एक घाव , दोन तुकडे, तेजस उद्धव ठाकरे” यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं ट्विट मिलिंद नार्वेकर यांनी केलं होतं.
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचं राजकारणात लाँचिंग होत आहे की काय याची चर्चा आता सुरु झाली आहे. कारण तेजस ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त (Tejas Thackeray Birthday) शिवसेनेतून लक्षवेधी पोस्ट सोशल मीडियावर करण्यात येत आहेत. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी आधी सामना दैनिकात हटके शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता त्यांनी ट्विटरवरुनही तेजस ठाकरे यांना भन्नाट शुभेच्छा दिल्या आहेत. “एक घाव , दोन तुकडे, तेजस उद्धव ठाकरे” यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं ट्विट मिलिंद नार्वेकर यांनी केलं आहे.
शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी तेजस यांच्या वाढदिवसानिमित्ताने दैनिक ‘सामना’च्या पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. त्यात त्यांनी तेजस ठाकरे यांची तुलना महान क्रिकेटपटून व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी केली आहे. ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस् तेजस उद्धव ठाकरे यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… असं या जाहिरातीत नार्वेकर यांनी म्हटलं आहे. तेजस यांचा क्रिकेटशी संबंध नसतानाही त्यांची व्हिव्हियन रिचर्डस यांच्याशी तुलना केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.