MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 9 August 2021

| Updated on: Aug 09, 2021 | 8:19 AM

राज्यातील सर्व मंदीर, प्रार्थना स्थळं हे लवकरच उघडले जातील. त्यासाठी पुढचे आठ ते दहा दिवस लागतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (8 ऑगस्ट) रात्री आठ वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज्यातील भाजप नेत्यांकडून मंदिरं सुरु करण्याबाबतची मागणी केली जात आहेत. तसेच काही मंदीर प्रशासनाकडूनही तशी मागणी केली जात आहे. या विषयावरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. राज्यातील सर्व मंदीर, प्रार्थना स्थळं हे लवकरच उघडले जातील. त्यासाठी पुढचे आठ ते दहा दिवस लागतील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

माझ्याजवळ दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र रेस्टॉरंट असोसिएशनचे पदाधिकारी आले होते. त्यांच्या अडचणी समजू शकतो. चार वाजेपर्यंतच मुभा आहे. पुढे कसं करणार, असं ते म्हणत होते. मी त्यांच्याशी बोललो. त्यांनी सुद्धा सहकार्य करण्याचं मान्य केलं. येत्या सोमवारी म्हणजे उद्या आपण राज्यातील टास्क फोर्सचा आढावा घेतो. त्यानंतर आपण काही नियमावली समजून घेतो. त्यानंतर राज्यातील रेस्टॉरंट, मॉल, प्रार्थना स्थळे एक-एक टप्प्याने सुरु करु. मात्र, यासाठी पुढचे आठ ते दहा दिवस लागणार आहेत. सगळ्यांचा संयम आता थोडा-थोडा तुटत आला आहे, याची मला कल्पना आहे. पण संयम तुटू देऊ नका. कारण हाच एक धोक्याचा क्षण असतो. कारण ज्यावेळी आपल्याला वाटतं आता कोरोना गेला त्याचवेळी जास्त धोका असतो”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

Published on: Aug 09, 2021 08:19 AM
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 9 August 2021
Hyderabad | हैद्राबादमध्ये भरधाव बाईकचा अपघात, चालकाचा मृत्यू