MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 14 July 2021

| Updated on: Jul 14, 2021 | 1:38 PM

राजनीतीकार प्रशांत किशोर यांनी गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दोनदा भेट घेतली. त्यानंतर काल काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली. या भेटीचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात असतानाच या भेटीतील मोठा तपशील बाहेर आला आहे.

राजनीतीकार प्रशांत किशोर यांनी गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची दोनदा भेट घेतली. त्यानंतर काल काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली. या भेटीचे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात असतानाच या भेटीतील मोठा तपशील बाहेर आला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आगामी राष्ट्रपती बनविण्यासाठी पीके म्हणजे प्रशांत किशोर यांची मोर्चेबांधणी सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे दिल्लीत राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे.

प्रशांत किशोर सर्व विरोधी पक्षांची मोट बांधत असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार करण्यासाठी पीके यांचे प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. 2022मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यामुळे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची आतापासूनच शोधाशोध सुरू आहे.

Ratnagiri | रत्नागिरीत पाऊस सुरुच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Chandrakant Patil LIVE | पंकजा मुंडे कधीच बंड करणार नाहीत – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील