MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 2 August 2021
राज्यातील दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. मात्र, ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, तिथेच ही परवानगी असेल.
दुकानांच्या वेळा आणखी चार तासाने वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे आता दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहणार असून त्याबाबतचा जीआर आज काढण्यात येणार आहे. मात्र, ज्या शहर आणि जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे, त्याच ठिकाणी दुकानांच्या वेळा वाढवून मिळणार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी आज स्पष्ट केलं. राज्यातील दुकाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. मात्र, ज्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. तिथेच ही परवानगी असेल. कोरोना रुग्ण संख्या अधिक असलेल्या ठिकाणी निर्बंध कायम असतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. या संदर्भातील जीआर आज संध्याकाळी निघेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.