MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 23 October 2021

| Updated on: Oct 23, 2021 | 4:18 PM

एनसीबी कार्यालयात उशिरा पोहोचलेल्या अभिनेत्री अनन्या पांडेला एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी चांगलंच फैलावर घेतलं. हे तुझं प्रोडक्शन हाऊस नाही, हे NCB कार्यालय आहे’, अशा शब्दात समीर वानखेडे यांनी अनन्या पांडेला खडसावलं.

एनसीबी कार्यालयात उशिरा पोहोचलेल्या अभिनेत्री अनन्या पांडेला एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी चांगलंच फैलावर घेतलं. हे तुझं प्रोडक्शन हाऊस नाही, हे NCB कार्यालय आहे’, अशा शब्दात समीर वानखेडे यांनी अनन्या पांडेला खडसावलं. सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलावलेली अनन्या एनसीबीच्या कार्यालयात दुपारी 2 वाजता गेली. यामुळे समीर वानखेडे यांचा चांगलाच पारा चढला.

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेचं नाव समोर आलं आहे. तिने आर्यन खानशी ड्रग्जसंबंधित व्हॉट्सअप चॅट केल्याचं समोर आलं आहे. याचप्रकरणी एनसीबी तिची चौकशी करत आहे. गुरुवारी अनन्या पांडेचं नाव समोर आल्यानंतर एनसीबीने थेट अनन्याचं घर गाठलं. तिला दुपारी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स दिलं. तिची त्याच दिवशी 2 तास चौकशीही केली गेली. काल (शुक्रवारी) पुन्हा एकदा अनन्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र अनन्या उशिरा गेल्याने समीर वानखेडे यांचा चांगलाच पारा चढला.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 23 October 2021
Imtiyaz Jaleel | हिंमत असेल तर औरंगाबादचं नाव बदलून दाखवाच, खासदार इम्तियाज जलील यांचं आव्हान