MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 3 PM | 31 December 2021

| Updated on: Dec 31, 2021 | 4:09 PM

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल लागले आहेत. 19 पैकी 10 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ पाच जागा मिळाल्या आहेत. अजून मतमोजणी सुरू असून इतर जागा कुणाच्या पारड्यात जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निकाल लागले आहेत. 19 पैकी 10 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ पाच जागा मिळाल्या आहेत. अजून मतमोजणी सुरू असून इतर जागा कुणाच्या पारड्यात जातात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले आहेत. तर भाजपचे विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. या ठिकाणी दोघांनाही समसमान मते मिळाली होती. त्यामुळे चिठ्ठीद्वारे झालेल्या प्रक्रियेत त्याठिकाणी देसाई यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 31 December 2021
Narayan Rane Live | आता लक्ष महाराष्ट्र सरकार, सगळ्यांना पुरुन उरलो : नारायण राणे