MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 1) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. या कारवाईमागे मला राजकीय वास येतोय, असा गंभीर आरोप खडसे यांनी केला. 2) जावयावर केलेल्या ईडीच्या कारवाईवर खडसे स्वत: बोलतील असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. पण ही सुडाची कारवाई असेल, तर महाविकास आघाडी एकत्र बसून चर्चा […]
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 |
1) राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. या कारवाईमागे मला राजकीय वास येतोय, असा गंभीर आरोप खडसे यांनी केला.
2) जावयावर केलेल्या ईडीच्या कारवाईवर खडसे स्वत: बोलतील असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. पण ही सुडाची कारवाई असेल, तर महाविकास आघाडी एकत्र बसून चर्चा करेल, असेही राऊत म्हणाले.
3) ईडीच्या माध्यमातून सत्तांतर करण्याचा प्रयत्न भाजपचा आहे, असं वक्तव्य मंत्री बच्चू कडू यांनी केलं. एकनाथ खडसे यांनी भाजप सोडली म्हणून त्यांच्यावर ही कारवाई केली जात असेल तर हे अयोग्य आहे, असेही कडू म्हणाले.
4) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी खडसेंच्या ईडीचौकशीवर प्रतिक्रिया दिली आहे. खडसेंनी चौकशीसाठी सहकार्य करायला हवं, असं दरेकर म्हणाले.