बीडमध्ये आज महाप्रबोधन यात्रा, संजय राऊत यांच्या जंगी स्वागतासाठी दोन क्विंटल फुलाचा हार अन्…
VIDEO | बीडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच्या वतीने महाप्रबोधन यात्रा, संजय राऊत यांच्या जंगी स्वागतासाठी परळी सज्ज, बघा तयारी
बीड : बीडमध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच्या वतीने महाप्रबोधन यात्रा होणार आहे. या यात्रेचा आज बीडमध्येच समारोप होणार आहे. महाप्रबोधन यात्रेकरता ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांची हजेरी पाहायला मिळणार आहे. त्याकरता संजय राऊत यांचं सकाळी दहा वाजता परळीमध्ये आगमन होणार आहे. संजय राऊत महाप्रबोधन यात्रेसाठी बीडमध्ये दाखल होणार असल्याने परळी तालुका शिवसेनेच्या वतीने जंगी स्वागताची तयारी करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी शिवसैनिकांकडून दोन क्विंटलचा फुलाचा हार क्रेनच्या सहाय्याने राऊत यांना घालण्यात येणार आहे. यासह परळी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जागोजागी, मोक्याच्या ठिकाणी महाप्रबोधन यात्रेसह संजय राऊत यांच्या स्वागताची बॅनरबाजी करण्यात आली आहे. दरम्यान बीडमध्ये आज होत असलेल्या ठाकरे गटाच्या महाप्रबोधन या यात्रेमध्ये संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत काय बोलणार याकडे साऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले होते. गुरूवारी या सभेच्या निमित्ताने सुषमा अंधारे सभा स्थळाची पाहणी करण्यासाठी बीडमध्ये आल्या होत्या. यावेळी जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासह सुषमा अंधारे यांचा वाद झाला. दोन फटके मारल्याचा दावा करणाऱ्या जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केला यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांच्यावर कारवाई देखील करण्यात आली. त्यांनतर आज या सभेत नेमकं सुषमा अंधारे काय बोलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.