Ahmednagar | अहमदनगरमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या ICU ला आग, 10 जणांचा मृत्यू

| Updated on: Nov 06, 2021 | 1:51 PM

राज्यातील शासकीय रुग्णालयांना लागणाऱ्या आगींच्या घटना काही थांबत नसल्याचं चित्र आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याची घटना समोर आलीय.Ma

राज्यातील शासकीय रुग्णालयांना लागणाऱ्या आगींच्या घटना काही थांबत नसल्याचं चित्र आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्याची घटना समोर आलीय. आगीच्या घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला आग लागल्यानं 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.आयसीयूमध्ये 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. हे सर्व रुग्ण कोरोनाबाधित होते. आगीची घटना कळताच पालकमंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूरहून अहमदगरकडे रवाना झाले आहेत. आग लागण्यास दोषी असलेल्यांवर कारवाई करणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं. तसेच मृतांना राज्य सरकारच्या वतीनं मदत करण्यात येईल, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.

पोलिसाच्या गाडीनं दुचाकीस्वाराला उडवलं, तीन चाकांवर गाडी चालवण्याचा थरार, API वर गुन्हा दाखल
VIDEO : Raj Thackeray | कसं आहे राज ठाकरेंचं नव घर ‘शिवतीर्थ’