कृषी बाजार समित्यांचा निकाल, कुणाला धक्का? कुणाचं वर्चस्व, बघा व्हिडीओ
VIDEO | ग्रामीण भागातील राजकारणात कृषी उत्पन्न बाजार समित्या खूप महत्त्वाच्या, कुणाला धक्का? कुणाचं वर्चस्व?
मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पार पडल्या. तर इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी 30 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. आज पार पडलेल्या निवडणुकांचा निकाल हाती येऊ लागला आहे. ग्रामीण भागातील राजकारणात कृषी उत्पन्न बाजार समित्या खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक झाली. राज्यातील 253 कृषी उत्पन्न बाजार समितींपैकी 18 ठिकाणी बिनविरोध निवड झाल्याचं आधीच स्पष्ट झालेलं. तर उर्वरित 235 कृषी उत्पन्न बाजार समितींच्या निवडणुकींचा धुराळा उडणार असल्याची माहिती समोर आलेली. यापैकी 147 बाजार समित्यांसाठी काल मतदान पार पडले. यापैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी होतेय. विशेष म्हणजे अनेक बाजार समित्यांचे निकालही आता समोर आले आहेत. कुणी वर्चस्व मिळवलं तर कुणाला धक्का बसला हेही समोर आले आहे. शिवसेनेचे नेते संजय राठोड यांना यवतमाळ दिग्रजमध्ये धक्का बसलाय तर बुलढाण्यात शिवसेनेचे नेते संजय गायकवाड यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अहमदनगरमध्ये भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का बसलाय तर त्याच ठिकाणी भाजपच्या शिवाजीराव कर्डीले यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बघा सविस्तर अपडेट