State Budget 2024 : अवघ्या काही मिनिटांनी महायुती सरकारचा अर्थसंकल्प, कोणाला काय मिळणार? कोणत्या विशेष तरतूदी असणार?

| Updated on: Jun 28, 2024 | 1:20 PM

विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पावसाळी अधिवेशनात सरकार कोणत्या मोठ्या घोषणा करणार याकडे विशेष सर्वसामान्य लोकांचं लक्ष लागलं आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार महायुती सरकारचे अंतरिम बजेट सादर करतील. या बजेटकडून सर्वसामान्यांपासून तर शेतकरी, व्यापारी, उद्योजकांना मोठ्या अपेक्षा आहे

राज्याचा 2024-25 चा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. महायुती सरकारच्या अंतरिम बजेटमध्ये राज्यातील जनतेसाठी नेमकं काय खास असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना पावसाळी अधिवेशनात सरकार कोणत्या मोठ्या घोषणा करणार याकडे विशेष सर्वसामान्य लोकांचं लक्ष लागलं आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार महायुती सरकारचे अंतरिम बजेट सादर करतील. या बजेटकडून सर्वसामान्यांपासून तर शेतकरी, व्यापारी, उद्योजकांना मोठ्या अपेक्षा आहे. आज दुपारी 2 वाजता हा अर्थसंकल्प सादर होईल. राज्याचा अर्थसंकल्प तुम्हाला साध्या, सोप्या भाषेत तुम्ही टीव्ही 9 मराठीवर आणि tv9marathi.com वर जाणून घेता येणार आहे.  शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी मोफत वीज, महिलांसाठी लाडली दीदी योजना, मोफत गॅस सिलेंडर योजना, सध्या राज्यात गाजत असलेल्या ओबीसी-मराठा आरक्षणावरुन दोन्ही समाजासाठी आणि इतर समाजासाठीच्या खास योजना, शैक्षणिक सवलतींवर भर, शिक्षणाचा खर्च कमी करण्यासाठीची खास तरतूद, आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूदीची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Published on: Jun 28, 2024 01:20 PM
जरांगे पाटलांच्या गावात तुफान दगडफेक, नेमकं काय घडलं? तणावाचं वातावरण अन् पोलीस पथक तैनात
Maharashtra Budget : अर्थसंकल्पात कोणत्या घोषणांचा पाऊस? महिला, बेरोजगार अन् शेतकऱ्यांना काय मिळणार?