Maharashtra Budget : अर्थसंकल्पात कोणत्या घोषणांचा पाऊस? महिला, बेरोजगार अन् शेतकऱ्यांना काय मिळणार?

| Updated on: Jun 28, 2024 | 1:37 PM

अर्थमंत्री अजित पवार आज सादर करणार आहेत. राज्याचा हा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या अर्थसंकल्पात बेरोजगार तरूण त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार आज सादर करणार आहेत. राज्याचा हा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या अर्थसंकल्पात बेरोजगार तरूण त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचबरोबर ओबीसी आणि मराठा, धनगर समाजाला काही सवलती मिळण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तर अजित पवार यांच्याकडून काल राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल देखील सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या प्रस्तावाची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. ९५ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा होण्याची शक्यता आहे. महिलांना दरमहा १२०० ते १५०० रूपये भत्ता घोषित केली जाण्याची शक्यता आहे. तर बेरोजगारांसह इतर घटकांसाठी काय असणार विशेष बघा व्हिडीओ?

Published on: Jun 28, 2024 01:37 PM
State Budget 2024 : अवघ्या काही मिनिटांनी महायुती सरकारचा अर्थसंकल्प, कोणाला काय मिळणार? कोणत्या विशेष तरतूदी असणार?
विधान परिषदेसाठी भाजपकडून ‘ही’ 10 नावं केंद्राकडे, आघाडीवर कोणत्या महिला नेत्याचं नाव?