भाजपचं ठरलं? 110 जणांची नावं निश्चित, विधासभेसाठी ‘या’ आमदारांचा पत्ता कट, तर कोणाला मिळणार संधी?

| Updated on: Oct 18, 2024 | 11:53 AM

भाजप उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. तर भाजपने यंदा मायक्रो प्लानिंग केल्याची माहिती मिळतेय. निवडून येण्याच्या क्षमतेत जे बसणार नाहीत, त्यांचा पत्ता कट होणार आहे. बघा कोणाचा पत्ता होणार कट आणि कोणाला मिळणार संधी?

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. या बैठकीत ११० जणांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. त्यामुळे अवघ्या काही तासात भाजपची पहिली यादी जाहीर होईल. यासोबतच रविवार पर्यंत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची यादी देखील समोर येणार असल्याची माहिती मिळत आहे. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार कोणाला किती जाणा मिळणार यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजप १६० किंवा त्यापेक्षा अधिक जागा लढण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला ७३ ते ७५ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ५५ ते ६० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तिकीट देताना भाजपने मायक्रो प्लानिंग केलं असून भाजपने दोन-तीन सर्व्हे केलेत यासोबत भाजपने काही जुन्या नेत्यांचं पुनर्वसन करण्याचं ठरवल्याची माहिती मिळतेय. तर काही आमदारांचा पत्ता कट होणार असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. घाटकोपर पश्चिम राम कदम यांचा पत्ता कट होण्याची शक्यता असून लोकसभेत तिकीट न मिळालेल्या मनोज कोटक यांना आमदारकीचं तिकीट मिळू शकतं. आणखी बघा भाजपकडून कोणत्या आमदारांचा पत्ता कट करण्याची शक्यता आहे.

Published on: Oct 18, 2024 11:52 AM
मनोज जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार? राजकीय एन्काऊंटर करण्याचा थेट इशारा
जयंत पाटील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? भर भाषणातून शरद पवार यांनी काय दिले संकेत?