Assembly Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभेचं बिगुल वाजणार, निवडणूक आयोग आज घोषणा करणार

| Updated on: Oct 15, 2024 | 11:00 AM

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Election Commission Press Conference : विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद होणार असल्याने जनतेचं लक्ष त्याकडे लागले आहे. महाराष्ट्रातील निवडणूक यंत्रणेची तयारीही अंतिम टप्प्यात सुरु असल्याने निवडणुकीच्या तारखांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow us on

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची आज घोषणा होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद आहे. दुपारी 3.30 मिनिटांनी ही पत्रकार परिषद सुरू होईल. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रसह झारखंड विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर कऱण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील जनतेचे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांकडे लक्ष लागले आहे. अशातच मोठी बातमी समोर आली असून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल आज वाजणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तर 4 जानेवारी 2025 पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी आहे. बऱ्याचदा सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नसल्याने दिवाळीच्या आधीच किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणुका पार पडण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.