MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाला सुनावले खडेबोल अन् घेतला मोठा निर्णय
VIDEO | आमदार अपात्रतेबाबत पुढील सुनावणी २६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर २५ ऑक्टोबरपर्यंत सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. दरम्यान, ६ याचिकांमध्ये ३४ याचिका एकत्र करण्याचा निर्णय यावेळी विधानसभा अध्यक्षांनी घेतला.
मुंबई, २० ऑक्टोबर २०२३ | विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेतली. दरम्यान सर्व याचिकांची एकत्रित सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विविध कारणांनुसार काही याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्याचं ठरवलं आहे. एकूण ६ कारणांसाठी याचिका एकत्र घेण्याचा निर्णय घेतला. ६ याचिकांमध्ये ३४ याचिका एकत्र करण्याचा निर्णय यावेळी त्यांनी घेतला. आमदार अपात्रतेबाबत पुढील सुनावणी २६ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर २५ ऑक्टोबरपर्यंत सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेली कागदपत्र माझ्यासमोर सादर करा, असे म्हणत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाला खडेबोल सुनावले आहेत.