राष्ट्रवादीचा निकाल कसा लागणार? तुमच्या मनातला एकमेव प्रश्न; विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टच म्हटलं…
केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कुणाची याचा निर्णय अखेर जाहीर केला. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा फैसला आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल जाहीर झाल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली, ७ फेब्रुवारी २०२४ : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कुणाची याचा निर्णय अखेर जाहीर केला आणि राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाकडे गेलं. अजित पवार यांच्याकडे खासदार आणि आमदार यांची संख्या जास्त असल्यामुळे आयोगाने पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे सोपावलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचा फैसला आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने निकाल जाहीर झाल्यानंतर राहुल नार्वेकर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी आमदार अपात्रप्रकरणी मेरिट नुसारच निकाल दिला जाणार आहे. निवडणुक आयोगाने दिलेल्या निकालाचा कुठलाही सबंध या निकालाशी जोडला जाणार नाही. राष्ट्रवादी पक्षाबाबत विधानभवनाकडून कोणतीही कागदपत्रे निवडणूक आयोगाकडून मागवण्यात आलेली नाहीत, असेही राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे.