Aurangabad | बँकेच्या विरोधात तरुणाचं डोकं फोडून आंदोलन, पोलिसांनी घेतलं ताब्यात

| Updated on: Sep 21, 2021 | 8:56 AM

बँकेकडून शेतकऱ्याचा छळ होत असल्यामुळे तरुणाने तीव्र आंदोलन केल्याची माहिती आहे. बँकेच्या समोर बँड वाजवून डोक्यात दगड मारत त्याने डोके फोडून घेतले. तरुणाने डोके फोडून घेतल्यानंतर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले

औरंगाबादमध्ये बँकेच्या विरोधात तरुणाने बँड वाजवत स्वतःचे डोके फोडून घेत आंदोलन केले. औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री तालुक्यात ही घटना उघडकीस आली आहे. मंगेश साबळे असं डोकं फोडून घेत आंदोलन करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. बँकेकडून शेतकऱ्याचा छळ होत असल्यामुळे तरुणाने तीव्र आंदोलन केल्याची माहिती आहे. बँकेच्या समोर बँड वाजवून डोक्यात दगड मारत त्याने डोके फोडून घेतले. तरुणाने डोके फोडून घेतल्यानंतर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी ताब्यात घेत असताना पोलीस आणि तरुण यांच्यात झटपट झाल्याचं समोर आलं आहे

Saamna | केंद्रीय जोर लावूनही महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार पडत नाही – सामना
सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 21 September 2021