Amruta Vs Rupali | अमृता वहिणींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो तसंच बोलण्यातही नसतो- चाकणकर
आजच्या महाराष्ट्र बंदवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावलाय.
लखीमपूर हिंसाचारा निषेध म्हणून आज सत्ताधारी महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यात सर्व ठिकाणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका करण्यात आली. दरम्यान, आजच्या महाराष्ट्र बंदवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला खोचक टोला लगावलाय. तर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अमृता फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.