Maharashtra Band : आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद, नेमकं काय घडलं?

| Updated on: Dec 16, 2024 | 12:31 PM

आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तर आज परभणीमध्ये आंबेडकर अनुयायांनी जिल्हा बंदची हाक दिली आहे. आंबेडकरी अनुयायांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

परभणीमधील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. तर आज परभणीमध्ये आंबेडकर अनुयायांनी जिल्हा बंदची हाक दिली आहे. आंबेडकरी अनुयायांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. काल न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी याला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. एका माथेफिरूने संविधानाच्या प्रतिकृतीची विंटबना केली होती. याविरोधात मोठं आंदोलन करण्यात आलं होतं. त्या आंदोलनात दगडफेक केल्याच्या आरोपाखाली सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. गेल्या १० डिसेंबर रोजी एका माथेफिरूकडून परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली. याच घटनेच्या निषेधार्थ ११ डिसेंबर रोजी आंबेडकरी अनुयायांकडून निषेध करत आंदोलन करण्यात आलं. ११ डिसेंबरच्या परभणी बंदमध्ये अनेक ठिकाणी दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली. त्याचवेळी दगडफेकीच्या आरोपाखाली सोमनाथ सूर्यवंशीसह काहींना अटक झाली. १४ डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशीला न्यायालयीन कोठडी झाली. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी १५ डिसेंबरला सोमनाथचा न्यायालयीन कोठडीतच मृत्यू झाल्याची घटना घडली

Published on: Dec 16, 2024 12:31 PM